बिहारमध्ये राजद नेत्याची गोळ्या घालून हत्या

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया येथे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते विनोद यादव यांची आज (शनिवार) सकाळी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली.
 
नवगछिया नगर पंचायतीचे सदस्य असलेले विनोद यादव यांच्यावर आज सकाळी सातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर नवगछियामध्ये तणाव असून, गावातील सर्व व्यवहार बंद आहेत. हल्लेखोर दुचाकींवरून आले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
 
या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. विनोद यादव यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वीच पाटणातील दानापूर भागात भाजप नेते अशोक जयस्वाल यांची हत्या करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *