खडकवासला धरणातून पाणी सोडले

पानशेत, वरसगाव धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, या धरणात येणाऱ्या येव्यामुळे जादा होणारे पाणी सोडून द्यावे लागते. त्यामुळे, शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता वरसगाव धरणातून 1200 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. ते पाणी खडकवासला धरणात जमा होत असल्याने खडकवासला धरणातून 856 क्‍युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

पानशेत धरणातून शुक्रवारी संध्याकाळी 602 क्‍युसेक विसर्ग वीज निर्मितीसाठी सोडला होता. तो मध्यरात्री एक वाजता बंद केला. परंतू टेमघरमधून 290 क्‍यसुेक विसर्ग सुरु आहे. वरसगावमधून 1200 क्‍युसेक वीज निर्मितीसाठी 533 क्‍युसेक असा सुमारे 2023 क्‍युसेक खडकवासला धरणात जमा होत आहे.
पानशेत वरसगाव धरणे 100 टक्के झाल्यामुळे खडकवासला धरणाची पातळी 100 टक्के आहे. ती थोडी कमी करावयाची असल्याने धरणातून रात्री बारा वाजता 856 क्‍युसेक पाणी नदीत सोडण्यात आले.

खडकवासला धरणातून नदीत 856 क्‍युसेक, कालव्यातून 1267 व बंद जलवाहिनीतून 325 क्‍युसेक असे मिळून 2178 क्‍युसेक पाणी खडकवासला धरणातून सोडले जात आहे. पानशेत धरणातून विसर्ग सोडल्यास खडकवासला धरणातून देखील विसर्ग वाढू शकतो.
शनिवारी सकाळी सहा वाजता धरणस्थिती
धरण- मागील 24तासातील पाऊस/1 जून पासूनचा पाऊस/टीएमसी/टक्केवारी/विसर्ग
टेमघर- 6/2686/3.30/88.92/290
पानशेत- 1/1905/10.65/100.00/0
वरसगाव- 2/1918/12.82/100.00/1200
खडकवासला- -0/693/1.97/100.00/856
चार ही धरणाचा एकूण पाणीसाठा – 28.74 टीएमसी, 98.59 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *