पुढच्या महिन्यात तुम्हालादेखील बँकेत काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ऑगस्ट 2026 मध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. ऑगस्टमध्ये विविध सण, जयंती, स्थानिक उत्सव तसंच, रविवार आणि चौथा शनिवार मिळून देशभरातील बँका 14 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळं तुम्हालादेखील बँकेची काही कामे करायची असतील तर सुट्ट्यांचे नियोजन आधीच करुन ठेवण गरजेचं आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या कँलेंडरनुसार या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये सारख्या नसून काही सुट्ट्या विशिष्टय राज्ये आणि शहरांपुरत्याच मर्यादित आहेत. त्यामुळं बँकेतील चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार, डिमांड ड्राफ्ट, पासबुक अपडेट किंवा शाखेत जाऊन करावयाची कामे सुट्ट्यांचे नियोजन बघून आधीच करुन घ्यावी किंवा त्यानुसार ठरवा.
कधी असणार सुट्ट्या
8 ऑगस्ट (शनिवार): महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी देशभरात बँकांना सुट्टी.
9 ऑगस्ट (रविवार): देशभरात साप्ताहिक सुट्टी.
13 ऑगस्ट: देशभक्त दिनानिमित्त इम्फाळमधील बँका बंद राहतील.
15 ऑगस्ट (शनिवार): स्वातंत्र्य दिनानिमित्त बँका बंद राहतील.
16 ऑगस्ट (रविवार): देशभरात साप्ताहिक सुट्टी.
19 ऑगस्ट: महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर जयंतीनिमित्त आगरतळामधील बँका बंद राहतील.
22 ऑगस्ट (शनिवार): महिन्याच्या चौथ्या शनिवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी.
23 ऑगस्ट (रविवार): देशभरात साप्ताहिक सुट्टी.
25 ऑगस्ट: मिलाद-उन-नबी/पहिला ओणम (कोची, तिरुवनंतपुरम, विजयवाडा येथे बँका बंद राहतील)
26 ऑगस्ट: ईद-ए-मिलाद/तिरुवोनम निमित्त दिल्ली, मुंबई, लखनौ, भोपाळ, बंगळूरू यासह अनेक प्रमुख शहरांमध्ये बँका बंद राहतील.
28 ऑगस्ट: रक्षाबंधन/श्री नारायण गुरु जयंती निमित्त बँकेला सुट्टी.
30 ऑगस्ट (रविवार): देशभरात साप्ताहिक सुट्टी
एटीएम चालू राहणार, ऑनलाइन सर्व्हिसदेखील सुरू राहणार
बँका बंद असल्या तरी चिंता करण्याची काही गरज नाही. डिजीटल बँकिग सेवा सुरळीत राहणार आहात. एटीएममधून रक्कम काढता येणार आहे. तसंच, जमा करतादेखील येणार आहे. तसंच, मोबाईल अॅप आणि इंटरनेट बँकिगच्या माध्यमातून देवाण-घेवाण करता येणार आहे. फंड ट्रान्सफरसाठी IMPS आणि NEFT सारखी सुविधादेखील जारी राहणार आहेत.
