काश्मीरमध्ये सीआरपीएफ तळावर दहशतवादी हल्ला

काश्मिरच्या कुपवाडा जिलतील नाचिन गावातील सीमा सुरक्षा दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सीमा सुरक्षा दलाचा तळ नाचिन गावात आहे. या तळावर सीमा सुरक्षा दलाचा शस्त्रास्त्र साठा असतो. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. जखमींना हेलिकॉप्टरने श्रीनगर येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरक्षा दलांची व दहशतवाद्यांची जोरदार चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराने जोरदार शोधमोहीम सुरू केली.

लष्कराचे शांततेचे आवाहन

गेल्या ४२ दिवसांपासून धगधगणा-या काश्मिरात शुक्रवारी लष्कराने शांततेचे आवाहन केले. प्रत्येकाने एका पाऊल मागे घ्यावे. तसेच सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वानी एकत्रित बसावे, असे आवाहन लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हुडा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *