आळंदीमध्ये भटक्या कुत्र्याला ३० ते ३५ जणांना चावा

येथे भटक्या कुत्र्याला ३० ते ३५ जणांना चावा घेतला. ही घटना काल रात्री घडली.

एका भटक्या कुत्र्यान आळंदी मध्ये दिसेल त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली! कुत्र्यानं ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात दर्शन घेरण्यासाठी आलेल्या भाविकांना ही सोडलं नाही. कुत्र्याच्या हल्यात अचानक पणे एवढे नागरिक जखमी झाल्यानं आळंदी मधल्या रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली.

आळंदीतल्या रुग्णालयात जागा नसल्यानं अनेकांवर पिंपरी मधल्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यानं सकाळी ही काही जणांवर हल्ला केलाय. कुत्र्याच्या हल्ल्यामुळं आळंदीत भीतीचे वातावरण असून या घटनेनं भटक्या कुत्र्याच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *