ऑलिंपिकमध्ये सिंधूला रौप्यपदक

भारताच्या पी. व्ही. सिंधूची ‘सुवर्ण’संधी हुकली. रिओ ऑलिंपिकमध्ये महिला बॅडमिंटन एकेरीच्या अंतिम लढतीत शुक्रवारी नवव्या सीडेड सिंधूला अव्वल सीडेड स्पेनच्या कॅरोलिना मॅरिनकडून २१-१९, १२-२१, १५-२१ असे पराभूत व्हावे लागले.

सिंधू आणि मॅरिनमध्ये आठ सीडिंगचा फरक होता. मात्र सिंधूने चांगले झुंजवले. सुवर्णपदक हुकले तरी सिंधूचे रौप्यपदकही ऐतिहासिक ठरले.

ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला क्रीडापटू ठरली आहे.

सिंधू आणि मॅरिनमध्ये आठ सीडिंगचा फरक होता. रंगलेला पहिला गेम जिंकून सिंधूने शानदार सुरुवात केली. मात्र दुस-या गेममध्ये मॅरिनने पुनरागमन केले. त्यामुळे निकालासाठी तिस-या आणि अंतिम गेमची वाट पाहावी लागली. या गेममध्ये सुरुवातीलाच आघाडी घेत मॅरिनने सिंधूवर दडपण आणले. १-६ अशी पिछाडी भरून काढताना १०-१० असे सिंधूने मॅरिनला गाठले तरी अप्रतिम स्मॅश आणि बॅकहँड फटक्यांच्या जोरावर सलग चार गुण मिळवत मॅरिनने ११-१६ अशी आघाडी घेतली आणि टिकवलीही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅरिनचे हे पहिलेच ऑलिंपिक सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने जागतिक स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक मिळवले आहे. शिवाय ऑल इंग्लंड ही प्रतिष्ठेची स्पर्धाही तिने जिंकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *