जावई-सासूच्या संसारात नवा टवीस्ट

सासू आणि जावई यांच्यात प्रेम बहरल्यानंतर सासू आणि जावयाने लग्न केलं, ही बातमी बिहारमध्ये न्यूज पेपर्सच्या पहिल्या पानावर झळकली होती.

नात्याला कलंक लावणाऱ्या या प्रेमकथेमध्ये सासू आणि जावयाने लग्न करुन संसार थाटला होता. पण आता या प्रेमकथेला आणखी एक वेगळ वळण लागलं आहे.

कारण जावई सूरजने आता सासू आशादेवीला घटस्फोट देण्याचं ठरवलं आहे. तसा अर्ज देखील सूरजने न्यायालयात टाकला आहे.

सूरजला आता आपल्या चुकीची उपरती झाली आहे. अशा देवी बरोबर लग्न करुन मी चूक केली. आशा देवीला मी आता पत्नीसारखी वागणूक देत नाही.

पूर्वपत्नी ललिताची समजूत घालून मी तिला पुन्हा माझ्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सूरजने सांगितले.

सूरजलाच नाही तर, आशा देवीला सुद्धा आता उपरती झाली आहे. मी चूक केली. मी सूरजकडे आता जावयाच्या नजरेतून बघते असे तिने सांगितले.

आशा देवी आणि सूरज कोर्टात विवाह करुनघरी परतले, तेव्हा समोरचे दृश्य बघून मुलगी चक्कर येऊन खाली कोसळली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *