शाळेमागे नग्नावस्थेत सापडलेल्या तरूणींच्या हत्येचा लागला छडा

वसईत शाळेच्या आवारात  सापडलेल्या अल्पवयीन  मुलीच्या हत्येचा  छडा अखेर पोलिसांनी लावला आहे. ३  जुलैला वसईच्या विद्याविकासनि शाळेच्या आवारात एका मुलोचा मृतदेह  नग्न अवस्थेत आढळला होता.

या मुलीचा नाव अंकिता टीकडे असून ती १७ वर्ष्याची आहे. पोलसांनी तिच्या  हत्ये प्रकरणी  मनीष यादव या २३ वर्षाच्या आरोपीला अटक केली आहे. या दोघाचे एकमेकांशी प्रेम संबध होते आणि प्रेम संबंधातून ही  हत्या झाल्याच पोलिसाची सांगितले आहे.

घटनेच्या दिवशी मनीष अंकिताला घेवून विद्या विकासनी शाळेच्या आवारात घेवून गेला होता. तिथे त्याने  दगडाच्या  साह्याने तिची हत्या केली. अंकिताचे आणखी  कोणाशी प्रेम संबंध आहेत याचा राग मनात धरून त्याने ही हत्या केली.

सुरूवातील हा बलात्कार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र  हा बलात्कार नसल्याचे ही पोलिसांनी सांगितले आहे. हत्येनंतर कोणाला संशय येवू नये म्हणून त्याने तिच्या अंगावरचे कपडे देखील काढून फेकून दिले होते. २ महिन्यापासून  आरोपी  पोलीस आरोपीच्या  शोधात होते . काल पोलिसांनी त्याला वेषांतर करून दिल्ली  इथून अटक केली आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा देखील नोंदवला असल्याचे वसई पोलीस उपाधीक्षक अनिल आकडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *