बॉलिवूडचा ‘बादशाह‘ शाहरुख खानला अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या विमानतळावर पुन्हा एकदा थांबवून ठेवण्यात आले. त्याची चौकशी करून नंतर सोडण्यात आले. शाहरुखने यासंदर्भात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
याबद्दल शाहरुख ट्विटरवर म्हटले आहे की, मी सुरक्षा व्यवस्थेचा आदर करतो, पण प्रत्येक वेळी असे प्रकार होणे चांगल नसल्याचं शाहरुखने म्हटलं आहे.
शाहरुखसोबत 2012 मध्येही न्यूयॉर्क विमानतळावर असाच घडला होता. यानंतर अमेरिकेने या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. शाहरुखला 2009 मध्येही दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘स्पॉटेड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जात असताना न्यूजर्सी येथे अडवण्यात आले होते.