सांगलीत आर्चीसाठी तरुणाई ‘सैराट’

सैराट’ चित्रपटातील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. सांगलीमधील विट्यामध्ये पोहोचलेल्या रिंकूला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी रिंकू विटा येथे गेली आहे.

विट्यातील कराड-सोलापूर रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी रिंकूला बोलावण्यात आले होते. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी चाहते सैराट झाले आहेत.

रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी झालेली गर्दी आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. पोलिसांनी उपस्थित चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. लाठीमार करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

हॉटेल रस्त्यावर असल्याने त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *