मुंबईतील बोरिवली-चर्चगेट या धावत्या लोकलमध्ये एका पोलीस शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमर महादेव गायकवाड असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.
बोरीवली-चर्चगेट लोकल पहाटे साडेपाचच्या सुमारास मालाड ते गोरेगाव स्थानकादरम्यान आल्यानंतर अमर यांनी त्यांच्याजवळच्या रायफलने छातीत गोळी घालून आत्महत्या केली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषीत केले.
अमर हे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते लोकल पेट्रोलींगच्या ड्युटीवर होते. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.