भिवंडीत पुन्हा इमारत कोसळली, दोन ठार

भिवंडीत पुन्हा इमारत कोसळली, दोन ठार

भिवंडीत दुमजली इमारत कोसळल्याची दुर्घटना रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोनजणांचा मृत्यू झाला असून अगनिशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत चारजणांना ढिगा-याखालून बाहेर काढले आहे.

भिवंडीतील हुनमान टेकडी परिसरात विनोद साईजिंगजवळ ही दुमजली इमारत होती. एकूण तीन कुटुंब या इमारतीत राहत होती.

भिवंडी महापालिकेने आधीच ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली असून दोनवेळा ही इमारत रिकामी करण्यासाठी नोटीस देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तरीही रहिवाशी जीव धोक्यात घालून या इमारतीत राहत होते.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले आहेत. ढिगा-याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण ही इमारत दाटी-वाटीच्या भागात असल्याने अग्निशमन दलाच्या गाडयांना त्या ठिकाणी पोहोचायला अडथळे येत आहेत

यापुर्वी रविवारी भिवंडीतील गैबी नगर भागातील दोन मजली इमारत कोसळून नऊ जण ठार झाले होते. ही इमारत सुद्धा पालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *