‘गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, दलितांवर नाही’

गोरक्षक दलावर टीका केल्यानंतर आता नरेंद्र मोदींनी दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा दलितांवर नको, वार करायचा असेल तर माझ्यावर करा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

हैदराबादमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. उनामध्ये गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी गाय मारल्याचा आरोप करत दलितांना मारहाण केली होती. या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदींवर जोरदार टीका केली होती.

गोरक्षक दलावर मोदींनी शनिवारी टाऊन हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कडक शब्दांमध्ये टीका केली होती, आणि आता मोदींनी दलितांवर अत्याचार करणाऱ्यांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *