गुरदासपूरचे वादग्रस्त माजी पोलिस अधीक्षक सलविंदरसिंग यांच्यावर बुधवारी (ता. 4) बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सलविंदरसिंग यांना निलंबीत करण्यात आले आहे.
पीडित महिलेचा पती एका गुन्ह्यामध्ये अडकला होता. पतीला गुन्ह्यामधून बाहेर काढण्यासाठी सलविंदरसिंगने महिलेचे लैंगिक शोषण करून 50 हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. सलविंदरसिंगवर गुन्हा दाखल झाल्यामुळे अटक होऊ शकते. याबाबत पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती गुरदासपूरच्या पोलिस अधिकारी परमिंदसिंग यांनी दिली.

