तातडीचा प्रसंग उद्भवल्यानंतर रुग्णाला पहिल्या तासात म्हणजेच गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी. गरीब रुग्णांना रेफर केल्यानंतर नजीकच्या शासकीय रुग्णालयात पोहोचविण्याची सोय राज्य शासनाने महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत केली. राज्यात 108 क्रमांकाची रुग्णवाहिका अर्थाच जीवनवाहिनी सुरू केली. दोन वर्षांत नागपूर विभागात या जीवनवाहिनीच्या धावणाऱ्या चाकांमुळे सव्वालाख व्यक्तींचा जीव वाचविण्यात यश आले. नागपूर जिल्ह्यात 42 रुग्णवाहिका विविध ठिकाणी सेवेसाठी कार्यरत आहेत.

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जानेवारी 204 मध्ये हा प्रयोग सुरू केला. पुण्यातील भारत विकास प्रतिष्ठान(बीव्हीजी ग्रुप)ला ही जबाबदारी देण्यात आली. बेसिक लाइफ सपोर्ट आणि ऍडव्हान्स लाइफ सपोर्ट या दोन स्वरूपांच्या रुग्णवाहिकांचा समावेश आहे. पहिल्या प्रकारच्या रुग्णवाहिकेत अतिदक्षता विभागाप्रमाणे पल्स ऑक्सिमीटर, सर्पदंश झाला असेल तर विषरोधक (अँटीव्हेनम), सलाईन अशा उपकरणांचा समावेश आहे. तर ऍडव्हान्स स्वरूपाच्या रुग्णवाहिकेत आणखी इसीजी मॉनिटर, हृदयाची स्पंदने सुरू करण्यासाठी शॉक मशीन, व्हेंटिलेटर, व्हॉलोमेच्रिक पंप, प्राण वाचविणाऱ्या जीवनरक्षक औषधांचा समावेश असतो. चार प्रकारचे स्ट्रेचरही उपलब्ध असतात. शिवाय गर्भवती मातेला रुग्णालयाच्या वाटेतच प्रसूतीकळा आल्या रुग्णवाहिकेतच प्रसूतीची सोय करता येते. प्रसूतीगृहातील सर्व सोयी सुविधा 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात 42 रुग्णवाहिका रस्त्यावरून धावत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी 21 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. नागपूर विभागात ही सुविधा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 लाख 25 लाख व्यक्तींचा जीव वाचविण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले आहे.