तर गुजरातमध्ये भाजपला मिळतील फक्त 65 जागा

गुजरातमध्ये सद्यस्थितीत जर विधानसभा निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला एकूण 182 जागांपैकी केवळ 60-65 जागेवरच समाधान मानावे लागेल, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने केलेल्या एका सर्व्हेतून समोर आल्याचे वृत्त आहे.

या सर्व्हेबाबत गुजरातमधील एका इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले आहे. गुजरातमध्ये झालेल्या दलित आंदोलनानंतर हा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेसाठी लोकांकडून माहिती घेण्यासंदर्भात संघाच्या प्रचारकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. हा संपूर्ण सर्व्हे या प्रशिक्षित प्रचारकांनी केला. हिंदू मतदान भाजपच्या बाजूने आहे, मात्र दलित मतदार भाजपपासून दूर जात असल्याची माहिती या सर्व्हेतून समोर आली आहे. दलित आणि पटेल समुदायाच्या आंदोलनामुळे भारतीय जनता पक्षाला किमान 18 जागांवर मोठे नुकसान होण्याची शक्‍यता सर्व्हेतून व्यक्त झाली आहे. गुजरातमधील संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना या सर्व्हेबाबत माहिती दिली. तसेच राजीनामा देण्यासाठी त्यांना तयार केल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *