मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. घाशीराम कोतवाल या नाटाकसह सामान, गाढवाचं लग्न या चित्रपट त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘श्री गणराय नर्तन करी’ या ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या नांदीवर पदन्यास करणाऱ्या कलाकारांच्या रांगेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी वामनमूर्ती, ‘सामना’मधील मास्तरांना सेवा देणारा वेटर, ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटातील राजा, छोटय़ा पडद्यावरील ‘नाजूका’ मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला ‘धर्म्या’.. अशा पोळ यांच्या अनेक भूमिका गाजल्या.
वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे बालवयातच नंदू पोळ यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नाटकापासून अभिनयाचा प्रवास सुरू केला. तसेच ते संस्थापक-सदस्य होते. ते ध्वनिमुद्रण तंत्रज्ञ होते व त्यासाठी त्यांनी स्वत:चा स्टुडिओ काढला होता.