महिलेची छेड काढणाऱ्या ‘रेल्वे रोमिओ’ला अटक!

रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेची छेड काढणाऱ्या एका रोमिओला पनवेल रेल्वे पोलिसांनी अटक केलीय.

अमोल उरणकर असं या रेल्वे रोमिओचं नाव आहे. २१ जुलै रोजी या रोमिओनं महिलेची छेड काढली होती. महिलेने त्याला तिथेच विरोध केला आणि त्याला पकडून पोलीस ठाण्यात घेऊन जात होती.

मात्र तिचा हात झटकून त्यानं तिथून पळ काढला होता. मात्र, हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं.

याप्रकरणी संबंधित महिलेनं महिला हेल्पलाईनची मदत घेत तक्रार नोंदवली.  त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अमोल उरणकर या तरूणाला अटक केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *