विराट सेनेचा विंडीजवर दमदार विजय

विराट सेनेने उत्तम गोलंदाजी करत पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजवर एक डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला. त्याबरोबरच  चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. पहिला डावात विंडीजचा धुव्‍वा उडविल्‍यानंतर दुसऱ्या डावात आश्विनने विंडीजच्‍या एकऐक फलंदाजाला तंबूत पाठविले. पहिल्‍या डावात विंडीजवर फालोऑनची नामुष्‍की आल्‍यानंतर दुसर्‍या डावात विंडीजने 231 धावा केल्‍या. पण निराशाजनकच सुरूवात झाल्‍यानंतर विंडीजला ऑलआऊट व्‍हावे लागले.
पहिल्‍या डावात विराट सेनेने 566 धावा केल्‍या होत्‍या. पण विंडीजने फक्‍त ऑलआऊट होत 243 धावांचा टप्‍पा पूर्ण केला. त्‍यानंतर भारताने परत फॉलोऑन दिल्‍यानंतर परत ऑलऑऊट होत 231 धावा केल्‍या.
विंडीजचा दुसरा डावच मुळात निराशाजनक सूरू झाला होता. धावांची शतकी पार करण्‍याआधीच विंडीजचे 4 फलंदाज तंबूत परतले होते.  सॅम्‍युअलचे अर्धशतक होते ना होते तोच तो ही बाद झाला. नंतर ब्‍लॅकवूड, चंद्रिका, होल्‍डर, चेस अशी फलंदाजांची फळीच भारतीय गोलंदाजांनी मोडीत काढली. पण अश्‍विन याचा किंगमेकर ठरला. पाच पेक्षा जास्‍त खेळाडू कसोटी सामन्‍यात बाद करणारा तो गोलंदाज ठरला आहे. अशी अफलातून कामगिरी त्‍याने 17 व्‍यांदा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *