बिजिंग येथील बडालिंग वाइल्डलाइफ़ पार्कमध्ये वाघाने महिलेवर हल्ला केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. वाघाच्या हल्ल्यात ही महिला ठार झाली असून अन्य एक महिला जखमी झाली आहे. येथील सीसीटीव्हीमध्ये हा हल्ला कैद झाला आहे.
या पार्कमध्ये मोठ्या संख्येने जंगली पशू आहेत. नागरिकांना या पार्कमधील रस्त्यांवर वाहन चालवण्याची परवानगी आहे. पण कोणत्याही परिस्थितीत वाहनातून उतरायचे नाही अशी सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत. पण ही महिला कारमध्ये उतरली होती. पण क्षणार्धात तिच्यावर वाघाने हल्ला करून तिला फरफटत नेले. या कारमधील एका महिला आणि पुरुषाने या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तिला वाचवण्यात यश आले नाही. येथील सुरक्षारक्षकांनीही घटनास्थळी धाव घेतली, पण त्याचा काही उपयोग होवू शकला नाही. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.