जर्मनीमध्ये दक्षिणेकेडील म्युनिक शहरामधील एका शॉपिंग मॉलमध्ये एका व्यक्तीने अंधाधूंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये १५ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर या हल्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मॉलमध्ये हल्ला झाल्याचे समजताच जर्मन पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शॉपिंग सेंटरमध्ये मोठी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी मॉलच्या आजूबाजुचा परिसर आणि रस्ता रिकामा केला. सुरक्षा दलांची कारवाई सुरू असल्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक थांबविण्यात आली आहे. स्थानिक सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, हॉनाओर स्ट्रेइज्ट, रिएस्ट्रेइज्ट आणि त्यानंतर ऑलिम्पिया शॉपिंग सेंटर अशा तीन ठिकाणी हल्ला झाला.
हल्लेखोर एकापेक्षा जास्त असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.