अल्पवयीन मुलीसोबत लग्न ठरवून तिला घरी बोलावून वराने तिचा विनयभंग केल्याची घटना कल्याणात घडली आहे. हे लग्न ठरविण्याआधी मुलाकडील मंडळींनी ५ तोळे सोने व मोटारसायकल हुंडय़ात मागितली. एवढा हुंडा मुलीकडील मंडळी देऊ शकली नाहीत. त्यामुळे ठरवलेले लग्न मोडण्यात आले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीचे लग्न ठरलेला शरद ठाकुर या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे.
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात पोलिस लाईन सोसायटीत ही १७ वर्षीय मुलगी रहाते. पीडित मुलीची आई पोलीस दलात कार्यरत आहे. पूर्वेतील नांदिवली परिसरात आर्या गुरुकुल शाळेसमोर शरद ठाकुर याचे कुटुंब रहाते. शरद याच्यासोबत फेब्रुवारी महिन्यात पीडित मुलीचा विवाह ठरला होता.