भारतीय वायू दलाचे विमान बेपत्ता

भारतीय वायू दलाचे विमान बेपत्ता

भारतीय वायू दलाचे एएन-३२ हे मालवाहतूक करणारे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात २९ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या विमानाशी संपर्क तुटला.

चेन्नई तांबरामहून पोर्ट ब्लेअर येथे हे विमान जात होते. सकाळी ७.३० च्या सुमारास या विमानाने उड्डाण केल्याची माहिती आहे. सकाळी ७.४६ वाजता या विमानाशी संपर्क झाला होता. ८.१२ मिनिटांनी हे विमान शेवटचे रडारवर दिसले होते.

भारतीय हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दलाकडून युद्धपातळीवर या विमानाचा शोध घेतला जात आहे. या विमानाचा शोध घेण्यासाठी एक डॉर्नियर विमान आणि चार युद्धनौका नौदलाने तैनात केल्या आहेत.

सध्या भारतीय वायूदलाच्या सेवेत १०० पेक्षा जास्त एएन-३२ विमाने आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *