करबुडव्यांचे पॅनकार्ड ब्लॉक करणार

करबुडव्यांचे पॅनकार्ड ब्लॉक करणार

बँकांना कर्जबुडव्यांनी अब्जावधी रुपयांचा गंडा घातल्यावर प्राप्तीकर खातेही सतर्क झाले आहे. करबुडव्यांनी देशाला गंडा घालण्यास प्रतिबंध करण्यासाठी खात्याने कडक उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता करबुडव्यांचे पॅनकार्ड ब्लॉक केले जाणार आहे. त्याशिवाय अशा करबुडव्यांची एलपीजी सबसिडी बंद केली जाणार आहे. तसेच त्यांना बँकेकडून कर्ज मिळणार नाही, याचीही व्यवस्था करण्यात येईल.

मोठय़ा प्रमाणावर करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी खात्याने यंदाच्या आर्थिक वर्षापासूनच हे उपाय अमलात आणण्याचे ठरवले आहे. प्राप्तीकर खाते अशा पद्धतीने पॅनकार्ड ब्लॉक करेल की करचुकवेगिरी करणा-यांना ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळणारच नाही. अशा करबुडव्यांना कर्ज मिळाल्यास ते बुडित कर्जात रूपांतरित होईल.

ब्लॉक केलेल्या पॅनकार्डची माहिती मालमत्ता रजिस्ट्रारकडे कळवली जावी व अशा पॅनकार्डशी संबंधित मालमत्तेची नोंदणी होऊ नये, असाही प्रस्ताव खात्याच्या पत्रकात सुचवण्यात आला आहे. एलपीजी सबसीडी करबुडव्यांच्या थेट बँक खात्यात जमा होते. त्यांना ती दिली जाऊ नये, असा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *