मुलीला जबरदस्तीने मुस्लिम बनविल्याचा आरोप

कोच्ची येथील ऍरोनॉटिकल इंजिनिअरींगमध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीला जबरदस्तीने मुस्लिम बनविल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.

पंगोडे येथील मिनी विजयन यांनी तिरुअनंतपुरम येथील पोलिस चौकीमध्ये धर्मपरिवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘अपर्णा असे आपल्या मुलीचे नाव होते. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ती वसतीगृहात रहात होती. परंतु, धर्मपरिवर्तन केल्यानंतर तिचे नाव अचानक शहाना झाल्याचे समजले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.‘

‘मिनी विजयन यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अपर्णाला न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी इस्लामचा प्रचार करणाऱया संस्थेत अपर्णा रहात असल्याचे समजले. अपर्णाने तिच्या सोबत असलेल्या मुस्लिम महिलेसोबत जाण्याची इच्छा न्यायालयात व्यक्त केली,‘ अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *