पत्नी, मुलीचा खून करून ‘तो’ गेला पोलिसांकडे!

कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीचा खून करून आरोपी स्वत: पोलिस चौकीत हजर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रोपळे गावातील प्रशांत वट्टमवार यांचा त्यांच्या पत्नीसोबत काही कौटुंबिक कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. दरम्यान आज (गुरुवार) पहाटे प्रशांतने पत्नी वृषाली वट्टमवार आणि मुलगी ज्ञानेश्‍वरी वट्टमवार झोपलेल्या असताना त्यांच्या डोक्‍यात लोखंडी पाईपने वार करून त्यांना ठार केले. त्यानंतर प्रशांत स्वत:हून जवळच्या पोलिस चौकीत हजर झाला. पोलिसांना सर्व घटना सांगून त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *