विद्यार्थिनीचा विनयभंग; प्राध्यापकाला अटक

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या डहाणूकर महाविद्यालयातील प्राध्यापकाला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली आहे. प्राध्यापकाला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. १२वीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थिनीला विलेपाल्र्यातील डहाणूकर महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून आले. सोमवार १८ जुलै रोजी ती परीक्षेसाठी महाविद्यालयात आली होती. पेपर लिहीत असताना वर्गावर पर्यवेक्षक म्हणून आलेल्या महेंद्र भंडारे (४५) याने तरुणीचा विनयभंग केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *