तोमर यांची ‘आप’मधून होणार हकालपट्टी?

तोमर यांची ‘आप’मधून होणार हकालपट्टी?

विधी शाखेची बोगस पदवी मिळवून फसवणूक आणि बनवेगिरी केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंद्र तोमर यांनी  फसवणूक  केल्याने अरविंद केजरीवाल नाराज असून  ‘आम आदमी पक्षा’तून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी प्रथम तोमर यांच्या बचावार्थ पुढे आलेला आम आदमी पक्ष आता बॅकफूटवर गेला आहे.
बनावट डिग्री प्रकरणात आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पक्षाला चुकीची माहिती देण्यात आल्याचे समोर आले असून केजरीवाल तोमर यांच्यावर नाराज असल्याचे समजते. त्यामुळे पक्षाने हे प्रकरण पक्षांतर्गत लोकपालकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तोमर यांची पक्षातून हकालपट्टी होऊ शकते.
गुरूवारी रात्री ‘ आप’ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत तोमर प्रकरणी बरीच चर्चा झाली. येत्या काही दिवसातच तोमर यांच्या हकालपट्टीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, तसेच पक्षातील इतर नेत्यांना कोणत्याही प्रकारच्या दुराचारापासून दूर राहण्याचा इशाराही देण्यात येईल, अशी माहिती पक्षातील एका नेत्याने दिली.
दरम्यान बनावट डिग्रीप्रकरणी चार दिवसांच्या पोलिस कस्टडीत असलेल्या तोमर यांना पोलिस भागलपूर युनिव्हर्सिटीत घेऊन गेले असून तेथे पुढील तपास करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *