अमेरिकेतील लुईझियाना प्रांताच्या बेटॉन रूज शहरातील पोलिसांवर एका अज्ञाताने गोळीबार केला आहे. यात ३ पोलीस ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
चकमकीत हल्लेखोर मारला गेल्याची पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. तसेच इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात सर्व ठिकाणी नाकाबंदी केल्याचेही सांगितले आहे.
बेटॉनचे महापौर किप होल्डन यांनी या घटने बद्दल आपण निश्चितपणे काहीही सांगू शकत नसल्याचे म्हंटले आहे. या हल्ल्या मागे दहशतवादी संघटनेचा हात आहे का याचा तपास घेतला जात आहे. अशी माहितीही त्यांनी दिली आहे.