शोरूमचे गोडावून फोडून कारची चोरी

नगर-मनमाड रस्त्यावरील मारुती कार शोरुमचे गोडावून फोडून चोरट्यांनी 8 लाख रुपयांची कार चोरून नेली. काल (दि. 15) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रकार निदर्शनास आला.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मनमाड रस्त्यावर मारुती कारची विक्री करणारे कांकरिया शोरुम आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शोरुमचे गोडावून बंद करून कामगार निघून गेले.
शुक्रवारी (दि. 15) सकाळी 9 वाजता गोडावून उघडले असता एक कार कमी दिसून आली. कार चोरीचा प्रकार उघडकीस येताच शोरुमच्या मॅनेजरने घटनेची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परंतु, व्यवस्थापनाने गोडावूनमध्ये ङ्गसीसीटीव्हीफ कॅमेरे नसल्याचे पोलिसांना सांगितले. रात्री शोरुममध्ये तीन सुरक्षा रक्षक असताना कारची चोरी झालीच कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याप्रकरणी शोरुमचे व्यवस्थापक प्रदीप सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्य पोलिस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक फौजदार संभाजीराव शेंडगे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *