पाकिस्तानमधील अण्वस्त्रे वरातींमध्ये फोडण्यासाठी बनवलेली नाही, पाकचा जळफळाट

पाकिस्तानमधील अण्वस्त्रे वरातींमध्ये फोडण्यासाठी बनवलेली नाही, पाकचा जळफळाट

भारताच्या म्यानमार मिशनमुळे पाकिस्तानाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. एकीकडे  केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी मिशनमुळे भारताची ओळख बदल्याचं सागितलं आहे. पर्रिकरांच्या या विधानाला पाकचे गृहमंत्री निसार अली खान आणि माजी राष्ट्राध्यक्ष पर्वेझ मुशर्रफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

म्यानमारमधील कारवाईमुळे आता राजकारण तापू लागलं आहे. भाजपनं लष्कराच्या धडक कारवाईप्रकरणी स्वत:ची पाठ थोपटवून घेतली आणि काँग्रेसचा जळफळाट झाला. यामुळे राजकीय आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

भारताच्या म्यानमार कारवाईने पाकचा जळफळाट

पाकिस्तानातील अण्वस्त्रे ही काही लग्नांच्या वरातींमध्ये फोडण्यासाठी बनवलेली नाही, असं वक्तव्य केलं आहे त्यामुळे म्यानमारच्या कारवाईनंतर भारत पाकिस्तानमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं आहे.

भारताने भले ही पाकिस्तानचा उल्लेख केला नसला तरी पर्रिकरांची विधानं जणू काही आपल्यासाठीच असल्याचं पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना वाटलं असावं आणि त्यामुळेच निसार अली खान या पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानातील अण्वस्त्रे ही काही लग्नांच्या वरातींमध्ये फोडण्यासाठी बनवलेली नाही. असं ते म्हणाले.

म्यानमार ऑपरेशनच्या श्रेयवादावर काँग्रेस भडकली

लष्कराने म्यानमारमध्ये केलेल्या ऑपरेशनचं श्रेय घेणाऱ्या मोदी सरकारच्या या नेत्यांवर काँग्रेस चांगलीच भडकली आहे.

8 जून रोजी म्यानमारमध्ये भारतीय सैनिकांनी दशतवाद्यांच्या कँम्पला शह देत 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मंगळवारी ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरल्यावर मोदी सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *