त्या वकील महिलेस कडक शिक्षा व्हावी! अपघातग्रस्त नोमानची मागणी

त्या वकील महिलेस कडक शिक्षा व्हावी! अपघातग्रस्त नोमानची मागणी

आॅडी कारच्या धडकेत जखमी झालेल्या साबुवाला कुटुंबीयांतील एकट्या नोमानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन बहिणी आणि त्यांच्या आईवर सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतून नोमान अद्यापही सावरलेला नाही. या अपघाताला जबाबदार असलेल्या महिलेला कडक शिक्षा करण्याची मागणी त्याने केली आहे.

नागपाड्यातील मोहम्मद अली रोड परिसरात राहणाऱ्या साबुवाला कुटुंबीयांचे याच परिसरात होलसेल साबणाचे दुकान आहे. सोमवारी नोमानचा दहावीचा निकाल लागला, त्यात त्याला ६५ टक्के गुण मिळाले. त्यामुळे सलीम साबुवाला यांनी भिवंडीतील एका ढाब्यावर जाऊन सहकुटुंब भोजनाचा कार्यक्रम आखला होता. हा कार्यक्रम आटोपून घरी परतत असतानाच त्यांच्या गाडीला आॅडीने जोरदार धडक दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *