सख्ख्या बहिणीवर भाऊ व मित्राने केला बलात्कार

भावाबहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना रोहा येथे समोर आली आहे. अल्पवयीन बहिणीवर सख्खा भाऊ आणि त्याच्या मित्राने बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात बालकांचे लंगिक शोषण कायदा आणि भादंवि कलम ३७६ अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करून पळवून नेल्याची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस करत होते. दोघांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी जेव्हा मुलीचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित मुलगी ही १६ वर्षांची असून गेली सात वर्षे तिचा सख्खा भाऊ तिच्यावर अत्याचार करत असल्याचे तीने पोलिसांना सांगितले. भावाच्या या अत्याचारापासून दूर जाण्यासाठी तिने त्याच्या मित्राची मदत घेतली. मात्र त्यानेही ३ जुल ते १३ जुल या कालावधीत तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. मुलीने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी तिचा सख्खा भाऊ आणि त्याचा मित्र या दोघांवर बालकांचे लंगिक शोषण कायदा आणि भादंवि ३७६ अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आणि दोघांनाही अटक केली. या दोघांना गुरुवारी माणगाव येथील सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *