आठवडाभरात खड्डे बुजविण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवडमधील बहुतांशी रस्ते खड्डेमय झाले असून, याची दखल आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतली आहे. येत्या आठवडाभरात शहरातील खड्डे बुजविण्याचे आदेश  त्यांनी संबंधितांना दिले आहेत. जलपर्णी काढण्याच्या कामाला अनेक वेळा मुदतवाढ देण्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील खड्डे बुजविण्याचे काम आठवडाभरात पूर्ण होणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, त्यामुळे शहरातील बहुतांशी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे चुकविताना अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत या विषयावरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले होते.
दरम्यान, या सर्व प्रकाराची आयुक्तांनी माहिती घेत, शहरातील खड्ड्यांची मोजणी करून ते आठवडाभरात बुजवले गेले पाहिजेत, असे आदेश दिले आहेत. संततधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक उपनगरांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने दुरवस्था झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *