बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्कात सिद्धार्थ चोप्राचे हॉटेल आहे आणि तिथे अनधिकृतपणे ‘स्मोकिंग झोन’बाहेर हुक्काही उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांच्या धाडीत समोर आले आहे.
पोलिसांनी १८ हुक्का मशीन जप्त केल्या आहेत. तसेच १६ ग्राहकांना नोटिसही बजावल्या आहेत. सिद्धार्थ चोप्राच्या हॉटेलवर कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे.