भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन यांच्यात खेळवण्यात आलेला सराव सामना अनिर्णीत राहिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ९३ षटकांत सहा बाद २५८ धावा केल्या आणि डाव घोषित केला.
भारतीय क्रिकेट टीम सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना झाली आहे. प्रॅक्टीस व्यतिरिक्त यावेळेस भारतीय खेळाडूंनी योगा देखील केला. भारताचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या फिटनेसकडे खूप अधिक लक्ष देतो आणि इतरांनीही त्याकडे लक्ष द्यावं असा त्याचा आग्रह असतो.
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलच्या आक्रमक शतकामुळे जमैका तलावासने टी-२० कॅरेबियन प्रीमियर लीगच्या चौथ्या सत्रात दमदार विजय मिळवला. जमैकाने ट्रिनबागो नाईट रायडर्सवर १० चेंडू राखत सात विकेटनी मात केली.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. ऑफ स्पिनर आर. अश्विनला दुखापत झाली आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा जोरदार सराव सुरु आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे या दौऱ्यासाठी विशेष तयारी करताना दिसतायत. वेस्ट इंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाने योगा सेशनमध्ये भाग घेतला.