कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना शह देण्यासाठी आता सरकारनं जोरदार उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मुंबईत ग्राहकांना स्वस्त भाजीपाला मिळावा यासाठी मुंबईच्या डायरेक्ट मार्केटिंग कंपनी मार्फत शेतमाल आणण्याची व्यवस्था केली आहे. या केंद्रांवर थेट शेतकरी आपला माल ग्राहकांना विकू शकतील. यामुळं ग्राहक आणि शेतकऱ्यांना लुटणारी साखळी गळून पडणार आहे.