सणासुदीच्या काळात तूरडाळीत भाववाढ

सणासुदीच्या काळात गोरगरीब जनतेला रेशनवर एक किलो तूरडाळ 120 रूपये किलो दराने देण्याची घोषणा केली असून तसे आदेश काढले आहेत. खुद्द सरकारने आदेश काढुनही त्याबाबत मात्र, जिल्हा पुरवठा विभाग त्याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळेच नागरिकांमध्ये संभ्रम असून सरकारच्या आदेशानंतरही तूरडाळ काही शिजेना असेच म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

तुरडाळीचे भाव आजही गगनाला भिडले असून बाजारात 180 ते 200 रूपये किलो दराने त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे गोरगरीबांसह सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी नागरिकांच्या जेवणातील वरणा-भात आजही महागच बनला आहे. यासर्व परिस्थितीवर उपाय म्हणून सरकारने बीपीएल व अंत्योदय रेशनकार्डधारकांना रेशनवर डाळ देण्याची घोषणा केली. तसे आदेशही काढले. मात्र, हे आदेश आजपर्यंत जिल्हा पुरवठा विभागापर्यंत पोहचलेलेच नाही. त्यामुळे पुरवठा विभागाने हातवर केले आहे. त्यामुळे नागरिकांची मात्र, कोंडी झाली आहे.

राज्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यात तुरडाळीने 250 चा दर गाठला होता. त्याचबरोबर इतर डाळींचे भावही 125 च्या पार पोहचले होते. त्यामुळे नागरिकाच्या रोजच्या जेवणातून डाळी हद्दपार झाल्या होत्या. त्यावेळी परिस्थितीवर मात करर्‍यासाठी सरकारने 110 रूपये दराने तुरडाळ देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते आजही सत्यता उतरले नाही. असे असतांनाच आता सरकाने पुन्हा नविन घोषणा केली आहे. त्यामुळेच नागरिकांची परिस्थिती सरकार देईना, अन् तुरडाळ काही शिजेना अशी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *