तोंडात कांदा कोंबून पित्यानेच केला मुलीचा खून

मुलीला १२ चा पाढा येत नाही म्हमून संतापलेल्या पित्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलीला ठार मारल्याची धक्कादायक घटना औरंगाबादजवळ घडली आहे. बाळापूर गावात घटना  सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली असूनन भारती कुटे असं मृत मुलीचे नाव आहे.
अवघ्या पहिल्या इयत्तेत शिकणा-या भारतीला बाराखडी येत नाही हे पाहून तिचे वडील राजेश यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी तिच्या तोंडात कांदा कोंबला. मात्र त्यामुळे त्या चिमुकलीचा श्वास कोंडला गेला. मुलीच्या आईने दिराच्या मदतीने तातडीने तिला दवाखान्यात नेले मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर त्या नराधम पित्याने तिला घराशेजारीच पुरून टाकले.
मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर चिखलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी राजेश कुटेला खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *