रहिवासी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू

एम्स येथील एका कनिष्ठ रहिवासी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडलीये. दहा दिवसांपूर्वी एम. डी. साठी प्रवेश घेतलेल्या सर्वानन गणेशन या तरूणाचा रविवारी सकाळी त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळला. 26 वर्षीय गणेशन दक्षिण दिल्लीतील हौज येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते.

इंजेक्शनच्या ओव्हरडोसमुळे हा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार डॉक्टरचा मृत्यू सकाळी साधारण 6 वाजता झाला असण्याची शक्यता आहे. परंतु मृत्यूचे निश्चित कारण व वेळ पोस्टमार्टेम अहवालानंतरच कळू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *