कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरुच असून, पंचगंगा नदीच्या पातळीतही वाढ झाली आहे.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासांत 15 फुटाने वाढ झाली असून, कृष्णा नदीचे पाणी येथील दत्त मंदिरात शिरले आहे. नदीच्या पाण्याची वाढ पाहता नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज (सोमवार) दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे
गगनबावड्यात 190.05 मिमी
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधित 190.05 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात सरासरी 90.91 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. तालुकानिहाय पाऊस मि.मी मध्ये पुढील प्रमाणे – गगनबावडा 190.05, करवीर 76.18, कागल 76.36, पन्हाळा 114.42, शाहूवाडी 162 हातकणंगले- 50.75, शिरोळ-54.14, राधानगरी 91.17 भुदरगड 78.02, गडहिंग्लज 34.57, आजरा 88.75 व चंदगडमध्ये 73.83 मि.मी., अशी एकूण 1090.88 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.

