पुण्यातील वाकड येथील पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री डिझेल भरण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आला.
वाकड येथील पेट्रोल पंपावरील कर्मचा-याने डिझेल कमी भरले या कारणावरून गाडीतील व्यक्तींचे आणि पेट्रोल पंपावरील कर्मचा-यांमध्ये वाद झाला.
यावेळी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्याचे गाडीतील लोकांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

