छगन भुजबळविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

छगन भुजबळविरोधात एसीबीकडून  गुन्हा दाखल

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवड्याभरात भुजबळ यांच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सदनाच्या बांधकाम कंत्राट वाटपासंदर्भात एसीबीने भुजबळ यांच्यासह १७ जणांविरोधातहा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल केलेल्यांच्या यादीत भुजबळ यांचे पुत्र पंकज छगन भुजबळ आणि पुतणे समिर भुजबळ यांच्या नावांचाही समावेश आहे.

याआधी सोमवारी मुंबईतील कलिना येथील जमीन अवैधरित्या बिल्डरला दिल्याप्रकऱणी भुजबळांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *