आंतर लागवड आणि अपुऱ्या उत्पादनामुळे डाळींच्या दरात वाढ होईल. मात्र उत्पादनापेक्षा बाजारपेठेतील उपलब्धतेमुळे भाज्यांच्या दरावर परिणाम होणार नाही, असा अंदाज मुख्य आर्थिक सल्लगार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी आज येथे व्यक्त केला.
भारतीय लोकांमध्ये डाळ खाण्याचे प्रमाण मोठे, मात्र मागणीच्या तुलनेत अपुरे उत्पादन होत असल्याचे सुब्रह्मण्यम यांनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सांगितले. अशा परिस्थितीत वाढत्या स्थानिक मागणीनुसार डाळींच्या लागवडीमध्ये वाढ केली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. प्राधान्य तत्त्वावर शेतकऱ्यांनी अशा पिकांचे उत्पादन घ्यावे तसेच डाळींचे उत्पादन वाढावे आणि किमात आधारभूत किमतीत वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याचे सुब्रह्मण्यम यांनी सांगितले. डाळींच्या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा चांगला वापर करता येऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
उत्पादनापेक्षा बाजारपेठेतील उपलब्धतेमुळे टोमॅटोसारख्या भाज्यांचे दर स्थिर राहण्यास मदत होणार असल्याचेही सुब्रह्मण्यम यांनी स्पष्ट केले.
उत्पादनापेक्षा बाजारपेठेतील उपलब्धतेमुळे टोमॅटोसारख्या भाज्यांचे दर स्थिर राहण्यास मदत होणार असल्याचेही सुब्रह्मण्यम यांनी स्पष्ट केले.
