भारतीय वायुदलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय.
भारतीय वायुदलात आच प्रथमच महिला फायटर प्लेन पायलट सहभागी झाल्यात. भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग या तीन तरुणींची पहिली तुकडी आज हवाईदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून सामिल झाल्यात. या तिघींचंही प्रशिक्षण पुर्ण झालं असून पासिंग आऊट पडेनंतर या तिनही रणरागीणी वायुदलात दाखल झाल्या.
या ऐतिहासिक क्षणासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पासिंग आऊट परेडसाठी इंडियन एअर फोर्स अकॅडमीत उपस्थित होते.