कल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले

गोरखपूरहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेतून एका तरुणीला चक्क बाहेर फेकल्याची घटना कल्याण ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यान गुरुवारी घडली. तिच्यावर कल्याणमध्ये उपचार सुरु आहेत.

महिलांच्या डब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला ही तरुणी आणि तिच्या आईने विरोध केला होता. त्याचाच राग काढत या तरुणाने तरुणीला रेल्वेतून बाहेर फेकून दिले. रेखा नवले असं या तरुणीचं नाव असून या मुलीवर सध्या कल्याणच्या फोर्टीस हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.

तरुणीला गाडीतून फेकणाऱ्या दिनेश यादव नावाच्या तरुणाला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अमित म्हामुनकर या दक्ष नागरिकाने जखमी रेखाला तातडीची मदत करून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *