येवल्यातला चिमुकला मोगली

येवला तालुक्यातील पाटोद्यात 12 वर्षीय रोहित गायकवाडने हरणांच्या दोन पाडसांना जीवदान दिलंय.

ठाणगाव रस्त्यावरील शेतात हरिणीने दोन पाडसांना जन्म दिला. हे पाडस एक दिवसाचे होत नाही तोच त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांची नजर पडली. कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला असता, भेदरलेल्या हरिणी आणि तिच्या पाडसांनी सैरभैर पळायला सुरूवात केली.

यावेळी ही पाडसं एका विहिरीत पडली. यावेळी लहानगा रोहित धाडस करून विहिरीत उतरला आणि या पाडसांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर दोन दिवस या पाडसांचा सांभाळ करून त्यांना येवला वनविभागाकडे सोपविण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *