ठाणे विधान परिषदेत रवींद्र फाटक आघाडीवर

ठाणे विधानपरिषदेच्या जागेसाठी आज (सोमवार) सकाळपासून मतमोजणी सुरु झाली असून, युतीचे उमेदवार रवींद्र फाटक सुमारे 100 मतांनी आघाडीवर आहेत.
ठाणे विधान परिषद निवडणुकीत बाजी कोण मारणार, याबाबत महाराष्ट्रात उत्सुकता आहे. शिवसेनेतर्फे रवींद्र फाटक, राष्ट्रवादीचे वसंत डावखरे दोघांनीही आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. लवकरच निकाल येणार आहे.  रविंद्र फाटक यांनी 100 मतांची सरशी घेतली आहे. ठाण्यातील 1060 मतदारांपैकी 1057 जणांनी मतदान केले होते.
 
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मतमोजणी करण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या ठाण्यातील एका जागेसाठी 3 जून रोजी मतदान झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *