पुढील चोवीस तासांमध्ये शहरात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल,‘ असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. पुढील पाच दिवस पूर्वमोसमी पाऊस पुणे शहर आणि परिसरात बरसेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये 16.5 मिलिमीटर पावसाची नोंद पुण्यात झाली.
शहर परिसरात शनिवारी संध्याकाळपासूनच ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली होती. त्या वेळी पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. मध्यरात्री बारा वाजल्यानंतर पावसाच्या तुरळक सरींना सुरवात झाली. मात्र रात्री दीड वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्यामुळे सकाळपासून शहर आणि परिसरात गारवा होता. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानाचा पाराही सरासरी इतका म्हणजे 33.7 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदला गेला.
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह शनिवारी रात्री उशिरा जिल्ह्यात सर्वदूर हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. पावसाचा वेग जोरदार असल्याने काही मिनिटांतच शेतांमध्ये, रस्त्यांवर पाणी साचले. ओढे, नाल्यांना पाणी आल्याने त्यावर बांधण्यात आलेले बंधारे भरून गेले आहेत.

जिल्ह्याच्या दुष्काळी भागात असलेल्या बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. इंदापुरातील अांथुर्णे, सणसर, लोणी, बारामतीतील माळेगाव, दौंडमधील देऊळगाव, पाटस येथे अतिवृष्टी झाली. अंथुर्णे येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. मुळशी, भाेर, मावळ, वेल्हे येथे अनेक ठिकाणी जोरदार, तर जिल्ह्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. पुणे जिल्ह्याच्या धरण परिसरातही पावसाने हजेरी लावल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.
जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) (स्त्रोत कृषी विभाग) : कळस १७, पौड १९, थेरगाव १७, माले १९, पिरंगुट १८, भोर २९, नसरापूर १९, किकवी ३६, निगुडघर १८, काले १६, लोणावळा १५, शिवणे १८, वेल्हा २४, पानशेत ३२, विंझर १८, अंभवणे १७, आळंदी २१, घोडेगाव १५, वडगाव ३६, कोरेगाव १५, शिरूर २२, बारामती ५५, माळेगाव ६०, पंदारे ५५, वडगाव ५०, लोणी २९, सुपा ३९, मोरगाव ३१, भिगवण ३९, इंदापूर १९, लोणी ६०, बावडा २०, काटी ३३, निमगाव ४५, अंथुर्णे ८०, सणसर ६७, देऊळगाव ६९, पाटस ६६, यवत २०, केडगाव ४०, राहू २५, वरवंड ४४, रावणगाव ३६, दौंड ३८, सासवड २२, भिवंडी २२, परिंचे ३३, राजेवाडी १९, वाल्हा, ३६.
पाऊस आला अन् वीज गायब
पिंपरी – शहरात रविवारी (ता. 5) रात्री जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या वळवाच्या पावसाने रविवारच्या सुटीत येथील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या शहरवासीयांची तारांबळ उडाली. पिंपरी कॅम्पात रिव्हर रोडवर एकामागोमाग एक तीन दुचाक्या घसरून तिघे जखमी झाले. मात्र, झाडे कोसळल्याच्या अथवा इतर दुर्घटनेचा कॉल नसल्याचे अग्निशामक दलातून सांगण्यात आले. पाऊस आला आणि वीज गेली. त्यामुळे शहरवासीयांची दुहेरी गैरसोय झाली.
रात्री पावणेनऊच्या सुमारास निरभ्र आकाश अचानक भरून आले. ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि काही मिनिटातच पाऊस बरसू लागला. 15 मिनिटे तो सुरू होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. मात्र, त्यामुळे बाहेर पडलेल्यांना आडोसा शोधावा लागला. रात्री साडेनऊपर्यंत पावसाची रिमझिम शहराच्या मध्यवर्ती भागासह भोसरीसारख्या उपनगरातही सुरूच होती. त्यामुळे दिवसभरातील उकाडा गायब होऊन वातावरणात गारवा आला. मात्र, पाऊस सुरू होताच वीज गायब झाली. त्यामुळे दुहेरी गैरसोय झाली. गुरुवारखेरीजही सध्या शहरात विजेचा लपंडाव सुरूच आहे. त्यातही काळेवाडी भागात, शनिवारीही मध्यरात्रीनंतर वीज गेल्याने उकाड्याने हैराण झालेल्या रहिवाशांची झोपमोड झाली. या भागात दररोज अनेकदा वीज जात असल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे तेथील नगरसेवकांनी “महावितरण‘विरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तीन दिवसांत मॉन्सून केरळमध्ये
नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने रविवारी दिली. महाराष्ट्रात त्यानंतर पुढील सहा ते सात दिवसांमध्ये मॉन्सून बरसणार असल्याची शक्यताही खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. अंदमानमध्ये चौदा दिवस मुक्काम केल्यानंतर मॉन्सूनने प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू केला आहे. मॉन्सून आता श्रीलंकेमध्ये दाखल झाला असून, त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रात येत्या मंगळवारपासून (ता. 7) कोकणात, तर गुरुवारपासून (ता. 10) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीलगत, तसेच बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील तापमानात किंचित घट झाली असून, रविवारी सकाळपर्यंत विदर्भातील उष्णतेची लाट विरून गेली असल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.