रितेश, जेनेलियाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

बॉलिवूडचे सुपरक्युट कपल अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया यांना पुन्हा एकदा ‘पुत्र’रत्नाचा लाभ झाला आहे. आज सकाळी जेनेलियाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. रितेश देशमुख याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. रितेश देशमुख आणि जेनेलियाचा मोठा मुलगा रिआन सध्या 2 वर्षांचा आहे. रितेश देशमुखने रिआनचा फोटो शेअर करत वेगळ्या पद्धतीने आपण वडील झाल्याची माहिती दिली आहे.
‘माझ्या आई बाबांनी मला छोटा भाऊ दिला आहे, आता माझी सगळी खेळणी त्याची’ असं ट्विट करत रितेशने रिआनचा फोटो शेअर केला आहे.
बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलियाकडे पाहिलं जात. 2003 पासून दोघं डेटींग करत होते. अखेर 2012 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. जेनेलिया गरोदर असल्यापासून रितेश तिची पुर्ण काळजी घेत आहे.  काही दिवासांपुर्वी करणसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या वेळी जेनेलियाला जेवणे अवघड जाऊ लागले, म्हणून पती रितेशने पुढे होऊन तिला जेवू घालण्यास सुरुवात केली होती. हा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *